नाना पटोले यांना आठवलेंचा थेट इशारा

सिनेमाच्या शूटिंगला रिपब्लिकन पक्ष संरक्षण देईल.

नाना पटोले यांना आठवलेंचा थेट इशारा

मुंबई : काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अभिनेता अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचे चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रात होऊन देणार नाही. तसेच त्यांच्या सिनेमांचे प्रदर्शन देखील राज्यात होऊ देणार नाही. असा इशारा दिल्या नंतर आता या वादात रिपब्लिकन पक्षाने उडी घेतली. पटोले यांच्या त्या धमकीचा आम्ही तीव्र विरोध करतो. जर काँग्रेस पक्ष या अभिनेत्यांच्या सिनेमांचे चित्रीकरण रोखण्याचा प्रयत्न करणार असेल तर रिपब्लिकन पक्ष अभिनेता अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार याचं संरक्षण करील. तसेच त्यांच्या चित्रपटाच्या चित्रकरणाला बाधा आणणाऱ्यांना रोखण्याचे काम रिपब्लिकन पक्ष करेल असा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.

आठवले यांनी म्हटलं आहे की, अशी धमकी देणे चुकीची आहे. नाना पटोले आमचे चांगले मित्र आहेत. हिंदी मराठी चित्रपट सृष्टी ही मुंबईची शान आहे. सिने उद्योग हा मुंबईतील महत्वाचा उद्योग आहे. त्यामुळे या उद्योगात अशी बाधा आणणे योग्य नाही. लोकशाहीत अशी धमकी देणे चुकीचे आहे. काँग्रेस पक्षाने या अभिनेत्यांचा विरोध करताना त्यांच्या सिनेमाचे चित्रीकरण बंद पडण्याचा प्रयत्न केला तर वेळ पडली तर रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करतील. अभिनेता अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना रिपब्लिकन पक्ष संरक्षण देईल असे रामदास आठवले यांनी जाहीर केले आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.