केंद्रीय पशूसंवर्धन विभागाचे पथक बर्ड फ्लूचा घेणार आढावा

बर्ड फ्लूच्या संसर्गाची पाहणी करण्याकरीता केंद्रीय पशूसंवर्धन विभागाचे पथक परभणीत दाखल होणार

केंद्रीय पशूसंवर्धन विभागाचे पथक बर्ड फ्लूचा घेणार आढावा

विजय कुलकर्णी / परभणीः बर्डफ्लूच्या संसर्गासह अन्य माहिती घेण्यासाठी केंद्र शासनाच्या पशूसंवर्धन विभागाचे पथक दि.२० रोजी परभणीत दाखल झाले आहे. हे पथक परभणी तालुक्यातील मुरूंबा, पेडगाव व सेलू तालुक्यातील कुपटा येथील घटनास्थळास भेट देणार आहे.

दरम्यान, मंगळवारी केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाचे चार सदस्यीय पथक आढावा घेण्यासाठी दाखल झाले त्यापाठोपाठ केंद्र शासनाच्या पशूसंवर्धन विभागाचे पथक दाखल होणार आहे. या पथकाने बीड येथे भेट दिली. तेथून ते परभणीकडेच येत असल्याची माहिती सुत्रांनी दिली. पशूसंवर्धन विभागाचे हे पथक आढावा घेणार आहे. घटनास्थळास भेट देऊन वस्तुनिष्ठ अहवाल सादर करणार आहे.

परभणी तालुक्यातील मुरूंबा येथील ८४३ कोंबड्या अज्ञात रोगाने मृत्यू पावल्या होत्या. मृत पावलेल्या कोंबड्यांचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले होते. प्रयोगशाळेकडून बर्डफ्लूमुळेच मृत्यू झाल्याचा अहवाल प्राप्त होताच जिल्हा प्रशासनासह पशूसंवर्धन विभागाने तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या.

मुरूंबा येथील बर्डफ्लू आटोक्यात येतो न येतो तोच सेलू तालुक्यातील कुपटा येथील ४२६ कोंबड्यांचा अज्ञात रोगाने मृत्यू झाला. त्यांचाही अहवाल बर्डफ्लूमुळेच मृत्यू झाल्याचा आल्यानंतर तेथेही जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्यासह पशूसंवर्धन विभागाने तेथेही उपाययोजना केल्या. पेडगाव येथेही एक पक्षी बर्डफ्लूने मृत्यू पावला. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या, पक्षांच्या खरेदी विक्रीसह अवागमनास बंदी घातली. त्याचबरोबर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी मुरूंबा येथे एक किलोमीटर परिसरातील कोंबड्या नष्ट करण्याच्या सूचना केल्या. प्रशासनाने केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे बर्डफ्लू ला निश्चितच आळा बसला असून केंद्रीय पथक यावर आता सुचना देणार आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.