माधव पिटले/ निलंगा : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद निलंगा शाखेतर्फे वसतिगृह सुरु करण्याबाबत नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. कोरोना काळात संपूर्ण भारताने अत्यंत यशस्वीपणे लढा देऊन जगाचे नेतृत्व केले आहे. पण आता परिस्थिती पुर्वरत येत आहे. शासनाने आतापर्यंत सर्व क्षेत्र उघडले आहेत आणि आता शिक्षण क्षेत्रात ही पाचवी ते बारावी पर्यंतचे वर्ग तसेच अन्य व्यावसायिक अभ्यासक्रम देखील सुरु करण्यास सूचना दिल्या आहेत. तसेच लवकरच १५ फेब्रुवारीपासून अन्य उर्वरित शिक्षण क्षेत्र देखील खुले होणार आहेत.
एकीकडे शाळा, महाविद्यालये सुरु झाले आहेत. पण वसतिगृह आणखीन सुरु झाले नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांना अन्य गावातून येण्यासाठी, शहरात राहण्यासाठी व भोजनासाठी अमाप खर्च येत आहे. हा खर्च प्रत्येक विद्यार्थ्यांना परवडेलच असा नाही. म्हणून शासनाने वसतिगृह सुरु करावेत अशी मागणी अभाविप करत आहे. त्याचबरोबर ज्या वसतिगृहात कोव्हिड विलागिकरण केंद्र होते असे वसतिगृह निर्जंतुक करावे. अशी मागणी अभाविपचे निलंगा शहर मंत्री व प्रदेश कार्यकारिणी सदस्य कृष्णा सुनिल पोतदार यांनी निवेदन देवुन केली यावेळी शहर सहमंत्री साक्षी कुलकर्णी, ईश्वर जेट्टी, शहर कर्यकरणी सदस्य प्रेम मुळे, ईमरान शेख, शोहेब मनियार उपस्थित होते.