सुमित दंडुके / औरंगाबाद : शिवशाही बस चालकास अडवून मारहाण व बसची काच फोडल्याप्रकरणी एका आरोपीला पुंडलीकनगर पोलिसांनी अटक केली आहे. राजेंद्र सुनील कपिले (वय.३०, रा.एन-७, आयोध्यानगर) असे याचे नाव आहे.
याबाबत सविस्तर व्रुत असे, बस चालक सुनील मोरे हे सिडको बसस्थानकावरून मध्यवर्ती बसस्थानकाकडे शिवशाही बस घेऊन जात होते. हायकोर्टाजवळ आरोपी राजेंद्र याने बसचालकास शिवीगाळ करत बस नीट चालवता येते का, असे म्हणत धमक्या दिल्या आणि मारहाण केली. बसचालक सुनील यांनी याचा विरोध करताच आरोपीने बसच्या काचेची तोडफोड केली.
बसचालक सुनील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात आरोपी राजेंद्र कपिले याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनीही तात्काळ आरोपीला अटक केली आहे. गुह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक प्रभाकर सोनावणे करीत आहे.
पोलिसांतर्फे आवाहन
कोणताही शासकीय कर्मचारी कर्तव्यावर असताना त्याला धमकी देणे, मारहाण करणे अश्या प्रकारचे गैरकृत्य करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच न्यायालयाकडून आरोपीस ३ ते ५ वर्षांचा कारावास देखील होऊ शकतो.
त्यामुळे कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याशी कुठल्याही प्रकारचे गैरवर्तन करू नये. असे आवाहन पुंडलीकनगर पोलीस स्टेशनच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.