विजय कुलकर्णी/ परभणी : प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे आयोजित केलेल्या पथ संचलनात महाराष्ट्राच्या वतीने महाराष्ट्राची संत परंपरा हा देखावा रथातून सादर केला होता. या रथावरील संत परंपरेच्या देखाव्यात समर्थ रामदास स्वामींना वगळण्यात आल्याने सेलू येथील हिंदूं समुदायाकडुन याचा निषेध व्यक्त करुन याबाबत तहसीलदारांना निवेदन दिले आहे.
याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निवेदन देण्यात आले आहे.निवेदनात म्हटले की,मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा या ध्येयाने राष्ट्राच्या कल्याणार्थ जय जय रघुवीर समर्थ अशी गर्जना करत राष्ट्रभक्ती, दासबोध, मनोबोध असे अनेक ग्रंथ लिहून भगवंत भक्ती करणाऱ्या संतालाच या परंपरेतून वगळण्याचे पातक सांस्कृतिक खात्याने केल्याने सेलु येथील हिंदूंकडून निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच कडवट हिंदुत्ववादी कीर्तनकार ह.भ.प. योगेश महाराज साळेगावकर यांनी सांस्कृतिक खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत दूरध्वनीवरून चांगलाच जाब विचारला. सेलू येथील कीर्तनकार ह.भ.प.योगेश महाराज साळेगावकर, अक्षय हुगे, कृष्णा काटे, सारंग गुरु सराफ, शाळीग्राम मुळे, मनोज दीक्षित यांनी निवेदन दिले आहे.