सुभाषचंद्र बोस,बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

हजारो हात थकल्यानंतर एक हात कामी येतो तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या परिवाराचा

सुभाषचंद्र बोस,बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

सिद्धेश्वर गिरी/ सोनपेठ : ग्रामपंचायत कार्यालयात सुभाषचंद्र बोस व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संयुक्त जयंतीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी गावातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना उपतालुका प्रमुख बाळासाहेब आरबाड यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. यासोबतच बाळासाहेब ठाकरे यांच्यावरही प्रकाश टाकत हजारो हात थकल्यानंतर एक हात कामी येतो तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या परिवाराचा आणि तो हात कायम लोकांच्या सामान्यांच्या हितासाठी कार्यरत राहील अशी आशा व्यक्त केली.

याप्रसंगी ग्रा.प.सदस्य उत्तम हारकाळ,भास्कर आरबाड, महादेव हारकाळ,दत्ता देंडगे, कल्याण मालसमिंदर,प्रकाश हारकाळ,यांच्यासह काशीनाथ आरबाड,बळीराम उबाळे, कारभारी दळवे,वसंत कांबळे,जयराम तूपसमिंदर,शरद आरबाड,अक्षय आरबाड,नामदेव लिंबोरे यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.