प्रदेश कांग्रेस अध्यक्षपदी नाना पटोले यांची नियुक्ती

६ नवे कार्यकारी अध्यक्ष तर १० उपाध्यक्षांची निवड

प्रदेश कांग्रेस अध्यक्षपदी 
नाना पटोले यांची नियुक्ती

मुबंई : महाराष्ट्र काॅग्रेस प्रदेशाध्यक्ष पदी अखेर नाना पटोले यांची निवड करण्यात आली आहे.याबाबत काॅग्रेस हायकमांडकडुन अधिकृत घोषणा करण्यात आली. नाना पटोले यांच्या सह ६ नवे कार्यकारी अध्यक्ष पक्षाने नेमले आहेत आणि १० उपाध्यक्षपदाचे चेहरे दिले आहेत. पटोले यांनी काल महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. गेल्या काही दिवसांपासून पटोले यांचे नाव काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत होतं. त्यावर अखेर हायकमांडने शिक्कामोर्तब केल्यानंतर पटोले यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर आज पटोले यांच्या नावाची घोषणा झाली.

कार्यकारी अध्यक्ष

१. शिवाजी मोघे
२. बस्वराज पाटील
३. नसीम खान
४. कुणाल पाटील
५. चंद्रकांत हंडोरे
६. प्रणिती शिंदे

उपाध्यक्ष

१. शिरीष चौधरी
२. रमेश बागवे
३. हुसैन दलवाई
४. मोहन जोशी
५. रणजीत कांबळे
६. कैलाश गोरंट्याल
७. बी. आय. नगराळे
८. शरद अहेर
९ एम. एम. शेख
१०. माणिकराव जगताप


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.