सुमित दंडुके / औरंगाबाद : ग्रामपंचायत निवडणूक निकालाच्या पार्श्वभुमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी-कर्मचारी गस्तीवर होते. यावेळी त्यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, हर्सुल-जटवाडा रोडवर एका मारोती अल्टो कारमधून नकली दारुची वाहतूक होत आहे.
यावरून उत्पादन शुल्कच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी एकतानगर येथे सापळा रचुन अल्टो गाडी क्र. MH 20 AY 970 अडविली आणि गाडीची झडती घेतली असता त्यात देशी दारु भिंगरी संत्राचे २० बॉक्स, ज्यात एकूण ९६० बाटल्या मिळून आल्या याची किंमत अंदाजे ५० हजारांच्या आसपास आणि २ लाख रु किंमतीची गाडी असे एकूण २ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी पुंडलीक रयाजी रहाटे हा फुलंब्रीतील हिवरा इथला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
नकली दारु विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्यास अटक
अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Loading...