वहिनीसाहेबांच्या घरी चिमुकल्याचं आगमन

धनश्रीने दिला एका गोंडस मुलाला जन्म...

वहिनीसाहेबांच्या घरी चिमुकल्याचं आगमन

मुंबई : छोट्या पडद्यावरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील वहिनीसाहेब म्हणजे अभिनेत्री धनश्री काडगावकर हिच्या घरी चिमुकल्याचे आगमन झाले आहे. धनश्रीने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. तिने चाहत्यांसोबत इन्स्टाग्राम वरून ही बातमी शेअर केली आहे. बाळ आणि ती सुखरुप असल्याचे धनश्रीने सांगितलं आहे.

काही महिन्यांपूर्वी एक खास व्हिडीओ शेअर करत गरोदर असल्याची बातमी धनश्रीनं चाहत्यांसोबत शेअर केली होती. ‘कुणीतरी येणार येणार गं..’ म्हणत पतीच्या वाढदिवसा दिवशीच धनश्रीने ही गोड बातमी शेअर करत चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला होता.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.