पटोलेंचा राजीनामा;पवारांचे वाद संकेत

विधानसभा अध्यक्षपद तिन्ही पक्षांचं होतं आता ते खुलं झालं

पटोलेंचा राजीनामा;पवारांचे वाद संकेत

मुंबई: कॉग्रेस नेते व महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे राजीनामा सोपविल्याची माहिती पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.त्यामुळे आता कॉग्रेस प्रदेशाध्यासाठी नाना पटोलेंच नाव निश्चीत झाल्याची माहिती आहे.

पवार यांनी दिले वादाचे संकेत
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवे वळण आले आहे. "विधानसभा अध्यक्षपद तिन्ही पक्षांचं होतं आता ते खुलं झालं आहे. आता विधानसभा अध्यक्षपदावर पुन्हा चर्चा होणार आहे" असं विधान शरद पवार यांनी केले आहे. काँग्रेस उपमुख्यमंत्रीपद मागणार अशी चर्चा असल्याने पवार यांनी विधानसभा अध्यक्ष पदावर पुन्हा चर्चा करण्याचे बोलल्यामुळे नवाच वाद निर्माण होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस या पदावर दावा करू शकते असेच पवार यांना सुचवायचे असावे.

कोण आहेत काँग्रेस मधील दावेदार
जर पटोले प्रदेशाध्यक्ष झाले तर विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण, संग्राम थोपटे, सुरेश वरपूडकर आणि अमीन पटेल यांच्या नावाची चर्चा आहे. चव्हाण या मुख्यमंत्री म्हणून राहिले आहेत.
संग्राम थोपटे भोर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. ते यावेळी तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. वडील अनंतराव थोपटे निष्ठावंत काँग्रेस नेते म्हणून ओळखले जातात. मंत्रीपद न मिळाल्यामुळे संग्राम थोपटे त्यांच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाची तोडफोड केली होती.
सुरेश वरपूडकर हे पाथरीमधून निवडून आले आहेत. अनेक वर्षांच्या राजकीय विजनवासा नंतर त्यांना हे पद मिळेल शिवाय परभणी जिल्ह्याला संधी असेल. वरपुडकर यांना 1998 मध्ये कृषी राज्यमंत्री संधी मिळाली होती. ते परभणी लोकसभा मतदारसंघामधून 98-99 मध्ये खासदारही होते.
अमीन पटेल यांनी हे मुंबईतील आमदार असून ही त्यांची तिसरी टर्म आहे . मुंबादेवी मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केलं आहे


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.