औरंगाबाद / सुमित दंडुके : लग्न करून आयुष्यभर तुझा सांभाळ करेल असे खोटे आश्वासनं देऊन किराडपुरा भागातील रिक्षाचालक अक्रम बाबू सय्यद (वय.३८) याने गारखेडा परिसरातील घटस्फोटीत महिलेवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. यासंबंधी पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी हा बांधकाम मिस्त्री आणि रिक्षाचालक असे दोन्ही व्यवसाय करतो. पिडीतेचे पतीसोबत पटत नसल्याने ५ वर्षांपूर्वी त्यांचा घटस्फोट झाला आहे. तेव्हापासून ती वेगळी राहते. काही वर्षांपूर्वी पीडितेच्या प्लॉटवर बांधकाम करण्यासाठी आरोपी आला होता. तेव्हा यांच्यात ओळख झाली, पुढे याचे रूपांतर प्रेमात झाले. तेव्हा आरोपीने लग्न करून आयुष्यभर तुझा सांभाळ करेल असे आश्वासन देऊन पिडीतेसोबत शरीर संबंध प्रस्थापित केले.
३ वर्ष आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर अत्याचार केले. त्यानंतर पीडिता लग्नासाठी मागे लागली असता आरोपी वेगवेगळी कारणे सांगून टाळू लागला, तिला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करू लागला, तिच्यापासून दूर राहू लागला, पिडीतेचे फोनही स्वीकारत नव्हता, आपला विश्वासघात झाल्याचे पीडितेच्या लक्षात आल्यानंतर तिने तात्काळ पुंडलीकनगर पोलीस ठाणे गाठत २७ जानेवारी रोजी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
आरोपी अद्याप फरार असून त्याचा कसून शोध सुरु असल्याचे पुंडलीकनगर पोलीस ठाण्याचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक घनश्याम सोनावणे यांनी सांगितले आहे.