अट्टल घरफोड्याला अटक

जिन्सी पोलिसांची आणखी एक दमदार कामगिरी, कस्टडी दरम्यान आरोपीकडून गुह्याची कबूली...

अट्टल घरफोड्याला अटक

सुमित दंडुके / औरंगाबाद :बायजीपुरा भागातील डॉक्टर दाम्पत्याचे घर फोडणाऱ्या अट्टल घरफोड्याला अटक करण्यात जिन्सी पोलिसांना यश आलय. इंदिरानगर बायजीपुरा गल्ली.नं.३१ येथील रहीवासी डॉक्टर अय्युब खान यांच्या राहत्या घरी दि.११ रोजी घरफोडी झाली होती. सय्यद समीर उर्फ स्टायलो (वय.२३, रा.बायजीपुरा) या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल ८ तोळे सोनं आणि रोख रक्कम ताब्यात घेतले आहे.

दि.२४ डिसेंबर रोजी डॉ.अय्युब खान हे घराला लॉक लावून कामानिमित्त बीड येथे गेले होते. दि.११ जानेवारी रोजी ते बीडहुन परत आले तेव्हा त्यांच्या घराचे लॉक त्यांना तुटलेले दिसले. घरात जावून पाहिले असता त्यांना लॉकर तोडून ११ तोळ्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरी गेल्याचे समजले. यानंतर त्यांनी तात्काळ जिन्सी पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.

पोलिसांनी ही लगेच तपासाचे चक्र फिरवत सिसिटिव्ही फुटेजच्या आधारे संशयित सय्यद समीर आणि त्याचा अल्पवयीन साथीदार या दोघांना ताब्यात घेतले. सुरुवातीला आरोपीने गुन्हा कबूल करण्यास टाळाटाळ केली, त्याने गुन्हा केल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करत दि.१४ रोजी कोर्टाकडून त्याची कस्टडी मागून घेतली. कस्टडी दरम्यान आरोपीने आपल्या अल्पवयीन साथीदारासह घरफोड़ी केली असल्याची कबूली दिली.चोरी केलेल्या पैकी ८ तोळ्याचे दागिने, रोख रक्कम आणि इतर साहित्य असे एकूण ४ लाख ४७ हजारांचा मुद्देमाल परत करण्यात आला.

आरोपी सय्यद समीर

या आरोपीवर यापूर्वीही सिडको, उस्मानपुरा आणि जिन्सी पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

सदरील कामगिरी जिन्सी पोलीस ठाण्याचे निरीक्षक व्यंकट केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक साईनाथ गीते, उपनिरीक्षक दत्ता शेळके आणि सहका-यांनी यशस्वी पार पाडली.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.