अवदुत गुप्ते यांच्या गीताने निलंगेकरात संचारला जल्लोष.

शेतकरी गीतातून मांडल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा प्रेषकांच्या ड़ोळ्यात आले पाणी

अवदुत गुप्ते यांच्या गीताने निलंगेकरात संचारला जल्लोष.

निलंगा : सुप्रसिद्ध गायक अवदुत गुप्ते यांनी शिवजयंतीच्या मोहत्सवाचे औचित साधून गायलेल्या जुन्या व नव्या रिमिक्स गाण्याने निलंग्यात उत्साह संचारला होता. शिवाय मराठवाड्यावर नैसर्गिक संकट कायमचे असल्यामुळे या भागातील नैराश्यामध्ये असलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा आपल्या गीतातून मांडल्या त्यावेळी उपस्थित प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी अश्रू तरळले.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने निलंगा शहरात प्रसिद्ध गायक अवदुत गुप्ते यांचा गायनाचा कार्यक्रम अयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे उदघाटन खा.सुधाकर श्रंगारे यांच्या हस्ते झाले.तर अध्यक्ष माजी खा.रूपाताई पाटील निलंगेकर,
सुशीलाबाई शिवाजीराव निलंगेकर,माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर,आ.रमेश कराड,युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर, जि.प.अध्यक्ष राहूल केंद्रे,जि.प.उपाध्यक्षा भारतबाई सोळुंके,प.स.सभापती राधा बिराजदार,नगरध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, उपनगरध्यक्ष मनोज कोळ्ळे, यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिवजयंतीच्या संस्कृतीक कार्यक्रमाच्या प्रारंभी सयाद्रिचा सिंह गर्जतो गर्जा महाराष्ट्र माझा या गीताने सुरवात केली.त्यामुळे उपस्थित प्रेक्षकात उत्साह संचाराला होता.गुप्ते यानी महापुरूषांच्या गीता बरोबर तरूणाईत जल्लोष निर्माण करणारे मराठी व हिंदी रिमिक्स गाणे सादर केले.आयुष्य हे चुलीवरल्या कडईतले कांदे पोहे,बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला,सखे तुझे नावाचे ग येड लागल,उन उन ओठातून गुलाबी धांदल,या सह अनेक गीत गायनाने प्रेक्षकांची मने जिंकली.

अवदुत गुप्ते यांच्या जल्लोष पूर्ण एका मराठी गाण्यावरा अरविंद पाटील निलंगेकर याना नाचण्याचा मोह आवरता आला नाही त्यांनी ठेका धरताच कलाकार अवदुत गुप्ते यानी मंचावरून खाली येऊन प्रेक्षकातच आपले नृत्य सादर केले.कोरोनाच्या संकटात संपूर्ण देश सापडला असताना सिने कलाकार हा दररोज जनतेत आपली कलाकारी सादर करत असतो परंतु लाॕकडाऊनच्या एक वर्षाच्या कार्यकाळात एकही ओपन स्टेज शो झाला नाही त्यामुळे कलाकारांसाठी जेल पेक्षा ही वाईट अवस्था होती.निलंग्यात हा पहिलाच कार्यक्रम असल्यामुळे माझ्या जीवनातील हा अविस्मरीय क्षण असून आज मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने अरविंद पाटील निलंगेकर यांच्या सारखा एक भाऊ मिळाला आहे.निलंग्यातील जनतेचे प्रेम आणि उत्साह मी कधीही विसरणार नाही निलंग्याचे माझे ऋणानुबंध कायम राहतील असे भावनिक उदगार अवदुत गुप्ते यानी काढले.

शिवजंतीसाठी गुन्हे दाखल झाले तर माझे भाग्य समजतो! माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर

निलंगा शहरात गेल्या पाच वर्षापासून शिवजन्मोत्सवाचा कार्यक्रम विविध सामाजिक उपक्रम घेऊन मोठ्या उत्साहाने साजरे केले आहे.यावर्षी शिवजयंतीवर शासनाने निर्बंध घातले आहेत.शासनाच्या कोरोना नियमावलीच्या आधीन राहून आम्ही कार्यक्रम घेत आहोत यावरही शासनाने शिवजयंती साजरी केल्यावर गुन्हे दाखला केले तर आम्ही आमचे भाग्य समजतो असे बोलून येणाऱ्या काळात अनेक महापुरूषांच्या जयंत्या कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरे करू असा अशावाद त्यानी शेवटी व्यक्त केला.

शिवरांयाच्या व शिवभक्तांच्या आशीर्वादाने आम्ही करून दाखवले.लातूर जिल्ह्यासह निलंग्यात गेल्या पाच वर्षात संस्कृतीक सामाजिक पर्यावरण संदेश पाणी बचतीचा संदेश देणारे कार्यक्रम अक्का फाँडेशनच्या माध्यमातून राबविले आहेत.परंतु गेल्या एक वर्षाच्या लाॕकडाऊन काळात येथील महिला वर्गाची अशी मागणी होती ती आम्हाला संस्कृतीक कार्यक्रमासाठी बाहेर पडता येते म्हणून आम्ही त्यांच्यासाठी हा संस्कृतीक कार्यक्रम घेतला आहे.भविष्यात अबाल वृद्ध व महिलासाठी अशा प्रकारचे मोठे कार्यक्रम घेणार आहोत.आपली उपस्थिती प्रेम पाहून असे कार्यक्रम घेण्याची उर्जा आम्हाला मिळते असे अरविंद पाटील निलंगेकर यानी आपल्या मनोगतात सांगितले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.