उपविभागीय पोलिस अधिकारी पदी अविनाश कुमार

परभणी शहर उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून आयपीएस दर्जाचे अधिकारी अविनाश कुमार यांची नियुक्ती

उपविभागीय पोलिस अधिकारी पदी अविनाश कुमार

विजय कुलकर्णी/परभणी: परभणी शहर उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून आयपीएस दर्जाचे अधिकारी अविनाश कुमार हे सोमवार दि. 1 रोजी रुजू झाले आहेत.
अविनाश कुमार हे यापूर्वी कोल्हापुर येथे कार्यरत होते. गृहविभागाने दोन महिन्यांपूर्वी उपाधीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांच्या केलेल्या बदल्यात अविनाश कुमार यांची परभणी येथे सहाय्यक पोलिस अधीक्षक म्हणून बदली केली होती. मात्र, ते रूजू झाले नव्हते. सोमवार दि.1 रोजी त्यांनी सहाय्यक पोलिस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील रिक्त असलेल्या पाच उपविभागापैकी परभणी ग्रामीण, पूर्णा येथे अद्यापही उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांची गृहविभागाने नियुक्ती केली नाही. गंगाखेड व सेलू उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांची गृहविभागाने नियुक्ती केली. त्यात गंगाखेड येथे मिलींद खोडवे तर सेलूत राजेंद्र पाल यांची पदोन्नतीवर बदली करण्यात आली होती. मात्र, मिलींद खोडवे हे अद्याप रुजू झाले नाहीत. तर सेलू उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून राजेंद्र पाल हे रूजू झाले आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.