महिलांनी ठोकले ग्रामपंचायतीला टाळे...

अवैद्य दारू विक्री बंदीसाठी प्रजासत्ताकदिनी महिलांचा ग्रामपंचायत समोर राडा...

महिलांनी ठोकले ग्रामपंचायतीला टाळे...

माधव पिटले / निलंगा : तालुक्यातील कलांडी येथे प्रजासत्ताक दिनी गावातील अनेक महिलांनी एकञ येत अवैध दारू विक्री बंद करा म्हणत ग्रामपंचायतला कुलूप लावले, आणि पोलीस व सरपंच यांच्यासमोर राडा केला.

अनेक वेळा सांगूनही गावातील अवैध देशी दारू विक्री बंद केली जात नव्हती म्हणून कलांडी येथील शेकडो महिला एकञ येत पोलीस व सरपंच, ग्रामसेवक यांच्या समोरच राडा करत जोपर्यंत अवैध दारू विक्री बंद होणार नाही तोपर्यंत ग्रामपंचायतीला लावलेले कुलूप काढणार नाही असा पविञा घेतला. पोलिसांनी बराच वेळ मध्यस्थी केली परंतु महिला आपल्या निर्णयावर ठाम होत्या. आंदोलनकर्त्या महिलांनी दारूबंदी विरोधात मोर्चा काढून ग्रामपंचायतीला टाळे ठोकले. शिरूर अनंतपाळ पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक स्वामी व पोहेकाँ.साठे यांना निवेदन दिले. गावात पुन्हा अवैध दारू विक्री चालू देणार नाही. असे अश्वासन देऊन देखील आंदोलनकर्त्या महिला ऐकत नव्हत्या. असे अनेक वेळा झाले आहे, आम्हाला ठोस अश्वासन द्या मगच कुलूप काढू असे म्हणत महिलांनी पोलिसांना जेरीला आणले होते.

यावेळी नागीनबाई मुगळे, सविताबाई सुर्यवंशी, झुमाबाई घोरपडे, अनिता घोरपडे, निलूबाई घोरपडे, लता घोरपडे, सुनिता सोनकांबळे, सुमिञा सोनकांबळे, यांच्यासह साईनाथ देविदास सूर्यवंशी, प्रसाद सूर्यवंशी, बलभीम बनसोडे, अखिल सूर्यवंशी, माधव सूर्यवंशी, देवा घोरपडे, राहुल हांडे, लखन सूर्यवंशी, गणेश कदम गावातील प्रतिष्ठित नागरिक रावसाहेब सूर्यवंशी, आणि अनेक नागरिक तरूण उपस्थित होते.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.