स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जागर गोंधळ

तहसील कार्यालयासमोर जागर गोंधळ आंदोलन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जागर गोंधळ

परभणी : गंगाखेड शुगर्स लिमीटेड या कारखान्याने तोडणी आणि वाहतुकीची थकीत देयके तातडीने वितरित करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गंगाखेड येथील तहसील कार्यालयासमोर आज जागर गोंधळ आंदोलन सुरू केले.

गंगाखेड येथील गंगाखेड शुगर्स या कारखान्याने २०१८-१९ या गळीत हंगामातील तोडणी आणि वाहतुकीची देयके वाहतुकदार व तोडणी मजुरांना वितरित केली नाहीत. सर्वसाधारणपणे त्या पोटी १३ कोटी ५१ लाख रुपये एवढी रक्कम बाकी आहे.

दरम्यान, या प्रकरणात जिल्हा प्रशासनाने तातडीने मध्यस्थी करीत कारखान्याने ही बिले वितरित करण्याबाबत कारवाई करावी, अशी अपेक्षा संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांच्यासह भास्कर खटिंग, माऊली शिंदे, भगवान शिंदे, नागेश शिंदे, रावसाहेब मुळे, महादेव हरकळ, सीताराम गिराम, बाबासाहेब चव्हाण, पंढरीनाथ महात्मे आदींनी व्यक्त केली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.