नवी मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज बेलापुर न्यायालयात हजर झाले होते. २६ जानेवारी २०१४ रोजी वाशीमध्ये राज ठाकरे यांनी भडकावू भाषण केल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांना टोल नाका फोडला होता. प्रकरणी राज ठाकरे यांच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यावेळी वाशी न्यायालयाने राज ठाकरेंना जामीन मंजूर केला आहे.अवघ्या १५ मिनिटांमध्ये हा निर्णय देण्यात आला आहे. १५ हजार रुपायांच्या जातमुचलक्यावर जमीन मंजुर करण्यात आला आहे.
या प्रकरण्याची पुढील सुनावणी ५ मे रोजी होणार आहे.यानंतर कोर्टाकडून साक्षीदारांना समन्स देण्यात येईल आणि केसला सुरुवात होईल. यापुढे राज ठाकरे यांना सुनावणीसाठी यावं लागणार नाही, असं वकिलांनी सांगितलं आहे. राज ठाकरे न्यायालयातून निघाले असुन पुढील कार्यक्रमासाठी ते ठाण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत