माधव पिटले/ निलंगा : यंदाची शिवजयंती साजरी करण्यासाठी शासनाकडून बंदी घातली आहे. मात्र निलंगा शहरात शिवजन्मोत्सव 'डंके के चोट पर' साजरा करणार असे आव्हानच माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून दिली आहे. शिवाय राज्य शासनाने काढलेला आदेश सरकारने मागे घ्यावा अन्यथा परिणाम भोगावे लागतील असा इशारा त्यांनी दिला आहे.
कोरोनाचे संकट अजूनही पूर्णतः टळलेले नाही त्यामुळे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजची जयंती यंदा साधे पणाने साजरी करण्याचे आवाहन केले आहे. राज्य शासनाने पूर्वी शिवजयंती उत्सवासाठी मार्गदर्शक सुचना जारी करीत १०० लोकांना उपस्थित राहण्याचे सांगितले आहे. दरम्यान सरकारने घातलेल्या निर्बंधाना आक्षेप घेत बार निवडणूका मेळावे माॅल सत्कार संभारंम मंत्र्याचे चे वाढदिवस जाहीर सभा नेत्यांचे वाढदिवस हे खुलेआम चालू असताना शिवजयंतीलाच निर्बंध का असा सवाल करत माजी मंत्री निलंगेकर यांनी राज्य शासनाच्या अशा निर्णायाला आव्हान देत आम्ही निलंग्यात 'डंके की चोट पर' शिवजयंती साजरी करणार असे म्हणत राज्य शासनाच्या आदेशावर सडकून टीका केली आहे.
शासनाने शिवजयंतीवर निर्बंध घालून शिवप्रेमीची चेष्टा केली असून काढलेला आदेश त्वरित मागे घ्यावा हिम्मत असेल तर आम्ही करत असलेली शिवजयंती रोखून दाखवावी असे म्हणाले तसेच हे शासनाने काढलेला आदेश म्हणजे नालायक पणाचा कळस आहे. असा आरोप करून त्यानी सरकारला इशारा दिला आहे.अक्का फाँडेशनच्या वतीने निलंगा शहरात १८ रोजी प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांचा 'शिवगर्जना' हा कार्यक्रम तर शुक्रवारी ता. १९ रोजी मराठी अभिनेते भरत जाधव यांचा प्रसिद्ध असा नाटक 'पुन्हा सही रे सही' सादर होणार आहे. या शिवजयंतीच्या निमित्ताने आरोग्याविषयी जनजागृतीसाठी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आले आहे. वय वर्ष ५ ते ५० या वयोगटात ही स्पर्धा असणार आहे. त्याच दिवशी दुपारी व्याख्यान आणि संध्याकाळी शिवगर्जना कार्यक्रम असेल. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे.
महाराष्ट्रात शिवजयंती साजरी करण्यासाठी बंधणे घातले असले तरी निलंग्यात मात्र दरवर्षी प्रमाणे शिवजयंती उत्साहात साजरी होणार आहे असे त्यांनी सांगितले आहे.