सुमित दंडुके / औरंगाबाद : जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून कोरोनाच्या नव्याने आढळणार्या रूग्णांत लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात कोरोनाचे रोजचे २० ते ३० रूग्ण आढळून येत होते. मात्र मागील चार दिवसांत यात मोठी वाढ झाली आहे. १६ ते १९ फेब्रुवारी या चार दिवसांत जिल्ह्यात तब्बल ५७१ रूग्णांची वाढ झाली आहे.
विशेष म्हणजे शहरात सर्वाधिक ४९१ रूग्ण आढळले असून ग्रामीण भागातील केवळ ८० रूग्णांचा समावेश आहे. यावरून पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने औरंगाबाद शहराला विळखा घातला आहे. विशेष म्हणजे, शहराच्या सर्वच भागांत रूग्ण आढळून येत आहे. काही भागात एकाच घरात तीन ते चार रूग्ण आढळत असल्याने कोरोनाचा संसर्ग आणखी गतीने पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.
काल दि.२१ रोजी शहरात २०१ रुग्णांची वाढ झाली आहे तर तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४८,६३८ झाली आहे. आजपर्यंत एकूण १२५४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण ९२१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत,