सिंधुदुर्ग : वैभववाडी नगरपंचायतमधील ७ राणे समर्थक नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आ.नितेश राणे यांच्या वागण्याला कंटाळून ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार आहेत. या ७ जणांसह माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांचाही समावेश आहे. राणे कालपर्यंत त्यांच्या परिवारावर दबाव टाकत होते, असा आरोप या नगरसेवकांनी केला आहे.
दरम्यान केद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर अवघ्या २ दिवसांत ७ राणे समर्थकांनी साथ सोडल्यामुळे आ.नितेश राणे यांना हा मोठा धक्का समजला जात आहे.