माधव पिटले/ निलंगा : भारतीय जनता पक्षाच्या वतीने महावितरण कार्यालयांवर महावितरणाने दिलेल्या (७५ लाख) वीज ग्राहकांना, कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील (४ कोटी) जनतेला अंधारात टाकण्याचे पाप ठाकरे सरकारने केलं आहे. महाविकासआघाडी सरकारच्या विरोधात तसेच, महावितरणाच्या निषेधार्थ निलंगा येथे महावितरण केंद्रांवर टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.
कोरोनाच्या कठीण काळातसुद्धा, आर्थिक संकटात सापडलेल्या जनतेला दुप्पट तिप्पट वीजबिल पाठवून आता वीजबिल कनेक्शन तोडण्याची धमकी देणाऱ्या ठाकरे सरकारला आपण सारे मिळून धडकी भरवल्याशिवाय, शांत बसायचे नाही मात्र 'गोरगरीब' जनतेला भरमसाट वीजबिल पाठवून सवलत देण्याचं आश्वासन देऊन, आता 'दुटप्पीपणा' भूमिका "ठाकरे सरकारने" का घेतली? म्हणून टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.
यावेळी भाजपा निलंगा तालुकाध्यक्ष शाहूराज थेटे, भाजपा शहराध्यक्ष विरभद्र स्वामी, जि.प.सदस्य संतोष वाघमारे, भाजपा ओबीसी संपर्क प्रमुख शरद पेठकर, कुमोद लोभे, अरविंद चव्हाण, आशिष पाटील, युवराज पवार, शिवपुत्र आग्रे, प.स.सदस्य हरीभाऊ काळे, आदी, सर्व मान्यवर उपस्थित होते.