प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान, नेत्ररोग तपासणी शिबीर

औरंगाबादेत संभाजी कॉलनी, गुलमोहर कॉलनी, अविष्कार कॉलनी शिवसेना शाखेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन...

प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान, नेत्ररोग तपासणी शिबीर

सुमित दंडुके / औरंगाबाद : आज ७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आणि नुकतीच झालेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अविष्कार चौक येथे भव्य रक्तदान आणि नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन माजी नगरसेवक वीरभद्र गादगे यांच्या वतीने करण्यात आले होते.
-------2
या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी, शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेत रक्तदान केले. तसेच डोळ्यांसंबंधी काही आजार असल्यास त्याचे मोफत तपासणी आणि निदान करण्यात आले.
पक्षाच्या कामाबरोबरच समाजकार्य देखील झालेच पाहिजे यासाठी प्रत्येक वर्षी शिवसेना शाखेच्या वतीने हा उपक्रम राबविला जात असल्याचे आयोजकांनी सांगितले.

यावेळी शिवसेना नेते चंद्रकात खैरे, राजु वैद्य, विश्वनाथ स्वामी, विरभद्र गादगे, मकरदं कुलकर्णी, शिवा लुंगारे. विद्याताई अग्नीहोत्री, अरुण गव्हाड, प्रशांत डिगळे,आशिष लकडे. यांच्यासह शिवसेना-युवासेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.