वाहतुकीचे नियम मोडताय,ही बातमी वाचाच!

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांसाठी मोटार वाहन विमा महाग होणार

वाहतुकीचे नियम मोडताय,ही बातमी वाचाच!

मुंबई: सरकारने वाहतुकीचे नियम कडक करूनही सर्रास नियम मोडल्याचे बघायला मिळते.ही बातमी वाहतुक नियम मोडणा-यांसाठी महत्वाची आहे. कारण आता मोटार वाहन विम्यात ‘वाहतूक नियम उल्लंघन हप्ता’ या नावाने स्वतंत्र कलम लावण्याची शिफारस भारतीय विमा नियामकीय व विकास प्राधिकरणाने (insurance Regulatory and Development Authority) केली आहे. ‘ओन डॅमेज’ आणि ‘थर्ड पार्टी’ अशा दोन्ही प्रकारातील विम्यांत हे कलम घातले जाणार आहे. त्यामुळे वारंवार वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांसाठी मोटार वाहन विमा महाग होणार आहे.

ग्राहकाने कितीही रकमेचे विमा संरक्षण घेतले असले तरी त्याच्या वाहन चालविण्याच्या सवयींचा विम्याच्या हप्त्यावर परिणाम होईल. असुरक्षितरीत्या वाहन चालवणाऱ्या वाहकांना आता वाहन विम्याचा हफ्ता जास्त द्यावा लागणार आहे. वाहतुकीचे नियम तोडल्यास वाहन चालकाच्या खात्यात १ ते १०० अंक जमा होणार आहेत, आणि या अंकांच्या साहाय्याने मोटार वाहन विमासाठी दंड आकारण्यात येईल .

दंड कसे आकारले जाणार

  • दारू पिऊन वाहन चालविल्यास १०० अंक चालकाच्या खात्यावर पडतील.
  • चुकीच्या पार्किंगसाठी १० अंक पडतील.**
  • ज्यांचे अंक २०च्या खाली असतील, त्यांना अतिरिक्त हप्ता पडणार नाही. २१ पासून पुढच्या अंकांसाठी दंडात्मक हप्ता सुरू होईल.
  • दुचाकी वाहनांसाठी १०० ते ७५० रुपये दंड आकारला जाईल.
  • चारचाकी व व्यावसायिक वाहनांसाठी ३०० ते १,५०० रुपये दंड असेल.

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.