सुंदर दिसत नाहीस म्हणून पत्नीला जाळले

वसमत तालुक्यातील घटना

सुंदर दिसत नाहीस म्हणून पत्नीला जाळले

प्रद्युमन गिरीकर/हिंगोली: वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे इथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे.
'तु दिसायला सुंदर नाहीस, तुला चांगले जेवण बनवता येत नाही' या कारणावरून पतीने पत्नीचा जाळून खून करत प्रेत नाल्यात फेकून  दिल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली.
वसमत तालुक्यातील कुरूंदा पोलिस स्थानकात अंतर्गत येणाऱ्या पांगरा शिंदे येथील रामा मारकळ हा त्याची पत्नी संगीता हिला तु दिसायला सुंदर नाहीस, तुला चांगले जेवण बनवता येत नाही या कारणावरून सतत मानसिक व शारीरिक छळ करीत होता. अनेकदा मारहाण केल्यानंतर त्याने तुझा काटा काढतो अशी धमकी देखील दिली होती. गुरुवारी रामा याने संगीता हिला बहाण्याने पांगरा शिंदे शिवारात नेले. याठिकाणी तिच्या अंगावर ज्वलनशील द्रव्य टाकून तिचा जाळून खून केला. त्यानंतर तिचे प्रेत नाल्यात फेकून दिले. ही घटना उघडकीस आल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपिनवाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी नानाराव घोडके यांच्या फिर्यादीवरून विवाहितेचा छळ करून खून केल्याप्रकरणी कुरुंदा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.