विशेष पथकाकडुन गांजा जप्त

कारवाईत एक लाख १३ हजार ७८५ रुपये किंमतीच्या गांजासह एकूण १ लाख ६३ हजार ७८५ रुपयांच्या मुद्देमालासह दोन जणांना पथकाने ताब्यात घेतले.,,

विशेष पथकाकडुन गांजा जप्त

विजय कुलकर्णी/परभणी : जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांच्या विशेष पथकाने शुक्रवार दि.१२ रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या एका लॉजमधून २३ किलो गांजा जप्त केला. या कारवाईत एक लाख १३ हजार ७८५ रुपये किंमतीच्या गांजासह एकूण १ लाख ६३ हजार ७८५ रुपयांच्या मुद्देमालासह दोन जणांना पथकाने ताब्यात घेतले.

या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकास परभणीतील बसस्थानक परिसरातील एका लॉजमध्ये काही व्यक्तींनी अंमली पदार्थ, गांजा अवैध विक्रीसाठी आणला असल्याची माहिती मिळाली होती. जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना, सहाय्यक पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिस अधीक्षक मीना यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश कुमार, परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक बापुराव दडस, फौजदार विश्वास खोले, फौजदार चंद्रकांत पवार, निलेश भुजबळ, सुग्रीव केंद्रे, यशवंत वाघमारे, शंकर गायकवाड, दीपक मुदीराज, अजहर पटेल, अरुण कांबळे, दीपक मुंडे, विष्णू भिसे, यांच्यासह कोतवाली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विवेक पाटील, कर्मचारी आईटवार, लटपटे, वाघमारे, गायकवाड, रामा कदम आदींनी शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास लॉज परिसरात छापा टाकला.
त्यावेळी तेथ दोन व्यक्ती आढळून आले. त्यांची चौकशी करीत त्यांच्याजवळील साहित्याची तपासणी केली असता त्यांच्याजवळील तीन वेगवेगळ्या पिशव्यात गांजा आढळून आला. एका प्रवासी बॅगमध्ये प्लास्टीक चिकटपट्टीच्या पॅकबंद पाकिटात दहा किलो ३३ ग्रॅम वजनाचा अंदाजे ५१ हजार ६७० रुपयांचा गांजा अवैध विक्रीसाठी साठवलेला पथकास आढळून आला. दुस-या बॅगमध्ये ९ किलो ३६ ग्रॅम अंदाजे ४५ हजार १८० रुपये किंमतीचा तर अन्य तिस-या बॅगमध्ये १६ हजार ९३५ रुपये किंमतीचा ३ किलो ३८७ ग्रॅम वजनाचा गांजा आढळला. पथकाने १ लाख १३ हजार ७८५ रुपयांचा गांजा जप्त केला. त्याचबरोबर या कारवाईत एक मोटारसायकल, मोबाईल असा एकूण १ लाख ६३ हजार ७८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

दरम्यान, परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक बापुराव दडस यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. विकास दाभाडे व युवराज भदर्गे या दोघांना पथकाने ताब्यात घेत कोतवाली पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणाचा अधिक तपास नानलपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे हे करीत आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.