विजय कुलकर्णी/परभणी : शहरातील बसस्थानक परिसरातील दोन एटीएम मशीन फोडून अज्ञात चोरट्यांनी २० हजार रूपये लंपास केल्याची घटना २ फेब्रुवारी रोजी घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
बसस्थानकासमोर असलेल्या माने कॉंम्प्लेक्स येथे दोन एटीएम मशीन आहेत. एका एटीएम मध्ये २९ लाख ९१ हजार तर दुस-या मशीन मध्ये २९ लाख ८० हजार रूपये रोकड होती. हे दोन्ही मशीन चोरट्यांनी फोडले. या दोन्ही मशीन मधून प्रत्येकी १० हजार रूपये असे २० हजार रूपये चोरट्यांनी लंपास केले. दरम्यान त्याच दिवशी क्रांती चौकातील बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून १२ हजार ५०० रूपयांचा डल्ला चोरट्यांनी मारला होता. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून घटनेचा पुढील तपास पोहेकाॕ जाधव करीत आहेत.