भरदिवसा कारमधून इतकी रोकड पळवली...

घटनेने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. सदरील बॅगमध्ये रोख रकमेसह चेक होते...

भरदिवसा कारमधून इतकी रोकड पळवली...

माधव पिटले / निलंगा : अमरावतीतून निलंगा शहरात आलेले कपड्याचे व्यापारी दिलीप खत्री हे वसूली करायला टाटा कंपनीची चारचाकी गाडी क्रमांक एम.एच.२७ बी.व्ही.२८९५ यामध्ये आले होते. त्यांनी वसूली केलेल्या पैशाची बॅग गाडीत ठेवली होती. ती बॅग चोरट्याने भरदिवसा घेऊन गेल्याची घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली. सदरील अज्ञात चोराविरूध्द निलंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, निलंगा शहरातील बँंक कॉलनी भागातील कपड्याच्या काही दुकानातून उधारी वसूली व चेक घेऊन गाडीत बसल्यानंतर गाडीतील ऑईल गळत आहे असे समजले त्यामुळे ते कासार शिरसी रोडवरील एका सर्विस सेंटरवर दुरूस्तीसाठी गेले तेव्हा मॅकानिक गाडी दुरूस्त करत असताना अचानक पाठीमागचे दार उघडून पैशाची बॅग व त्यातील चेक अज्ञात आरोपीने पळवून घेऊन गेल्याची घटना घडल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. सदरील बॅगमध्ये ८० हजार रोख रकमेसह अनेक चेक होते. दिलीप यांनी तात्काळ निलंगा पोलिस ठाणे गाठून अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिल चोरमले व त्यांचे सहकारी करत आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.