विजय कुलकर्णी/ परभणी : ताडकळस येथून जवळच असलेल्या महातपुरी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दि.१४ फेब्रुवारी रोजी सकाळी साविञीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून व्हॅलेंटाईन डे ऐवजी मातृ पितृ पूजन दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी आपापल्या आई वडिलांची पुजा करून पुष्पहाराने स्वागत केले. कार्यक्रमाला ग्रामस्थ आणि पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ह्या अनोख्या कार्यक्रमामुळे येथील ग्रामस्थ भारावून गेल्याचे चित्र यावेळी पहायला मिळाले. या कौतुकास्पद कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते विष्णुपंत परडे यांनी केले होते. यावेळी सरपंच मुक्तबाई कदम, उपसरपंच इंदूबाई एडके, बबन कदम, प्रकाश कस्तुरे, गजानन कदम, पोलीस पाटील राम कस्तुरे, माधव एडके, शालेय समितीचे अध्यक्ष दिपक कस्तुरे, रामप्रसाद सावकार, साहेबराव कस्तुरे, सचिन सोनकांबळे, सुरेश भरारे, दिलीप जंगाले, पिराजी कस्तुरे आदींची उपस्थिती होती. यावेळी ग्रामस्थांनी शाळेच्या प्रगतीविषयी शिक्षकांचे आभार मानुन विद्यार्थ्यांसह पालकांनी शिक्षकांचे स्वागत केले.