महाविकास आघाडीचा चक्का जाम

किसान आंदोलनाला पाठिंबा...

महाविकास आघाडीचा चक्का जाम

माधव पिटले/ निलंगा : केंद्र सरकारच्या विरोधात दिल्लीतील किसान आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी चक्का जाम व केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौक निलंगा येथे महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाषणे केले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख अविनाश रेशमे, कॉंग्रेसचे अशोक पाटील निलंगेकर, अभय साळुंके प्रा.दयानंद चोपने,राष्ट्रवादीचे दिलीप पाटील,इस्माईल लदाफ,नारायण सोमवंशी,विलास सुर्यवंशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. त्यात काँग्रेसचे तालुकाप्रमुख विजयकुमार पाटील, गोविंदा शिंगाडे, लाला पटेल ,अजगर अन्सारी, सुरेंद्र धुमाळ ,महेश देशमुख, शिराज देशमुख, अमित नितनवरे, दयानंद चोपणे ,विलास सुर्यवंशी, विलास माने ,उल्हास सूर्यवंशी, राष्ट्रदीचे शहर अध्यक्ष धम्मानंद काळे,पंडित धुमाळ, हसन चाऊस,ओम शिंदे ,अॕड.हरिभजन पौळ, ईश्वर पाटील, सुनील नाईकवाडे, प्रा.अण्णासाहेब मिरगाळे, प्रशांत वांजरवाडे, नागनाथ बाबळसुरे, श्रीहरी मुगळे, धनराज मुळे, यशवंत बसपुरे, सतीश फट्टे, बालाजी माने, उमेश सातपुते, प्रसाद मठपती, रवी नागरसोगे आदि पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होते.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.