'फास्टॅग'च्या नियमात बदल

१५ फेब्रुवारीपर्यंत सर्व वाहनांवर फास्टॅग स्टिकर बसवणे बंधनकारक असेल...

'फास्टॅग'च्या नियमात बदल

मुंबईः भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानुसार, फास्टॅग खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची अट काढून टाकली आहे. यापुढे फास्टॅग खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची गरज भासणार नाही. टोल प्लाझावर ट्रॅफिक जामची परिस्थिती उद्भवू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. १५ फेब्रुवारी पासून फास्टॅग अनिवार्य असणार आहे.

व्यावसायिक वाहनांसाठी अद्याप जुना नियम लागू आहे. प्रवासी वाहनांसाठी फास्टॅग चे नियम बदलण्यात आले आहेत. फास्टॅगच्या खरेदीदरम्यान, प्रवासी वाहनांच्या जसे की कार, जीप, व्हॅनसाठी सिक्युरिटी म्हणून काही शिल्लक ठेवणे बंधनकारक होते. टोल प्लाझावरुन जात असताना ड्रायव्हरच्या फास्टॅग रिचार्ज नसल्यास वाहनांना टोलवर थांबावे लागत होते. यामुळे टोल प्लाझावर ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता असते. पण आता असे होणार नाही. टोल प्लाझा पार केल्यानंतर, जर आपल्या खात्यात उणे शिल्लक राहिली असेल तर, बँक सिक्युरिटी पैसे वसूल करू शकेल, जे वाहन मालकास पुढील रिचार्जवर भरावे लागेल. केंद्र सरकारने आता संपूर्ण देशात फास्टॅग सक्तीचे केले आहे. १५ फेब्रुवारी पासून फास्टॅग अनिवार्य होणार आहे, यापूर्वी डिसेंबरमध्ये, फास्टॅग च्या अंमलबजावणीची नवीन अंतिम मुदत १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत वाढवण्यात आली होती.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.