परभणी : "माझ गाव सुंदर गाव" उपक्रमांतर्गत स्वच्छता आणि गावाला सुंदर करण्यासाठी परभणी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी सरसावत आहेत. आज जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमांतर्गत मानवत तालुक्यातील ताडबोरगाव या ग्रामपंचायतीमध्ये लोकप्रतिनिधी आणि जि.प. अधिकाऱ्यांच्या मदतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेमध्ये गावातील नाल्यांची स्वच्छता करण्यात आली. गावाच्या बाजूला असलेल्या काटेरी बाभळी काढण्यात आल्या, सांडपाण्याचे नियोजन व्हावे यासाठी गावात शोषखड्डेही तयार करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे आणि त्यांच्या टीमने गावामध्ये दिवसभर थांबून स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या राबवली.
यावेळी स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तूबाकले, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, गट विकास अधिकारी सुनिता वानखेडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रेहान शेख, सरपंच नीता काजळे, ग्रामसेविका लोमटे, उपसरपंच उमर पठाण, सचिन पठाडे, स्वच्छ भारत मिशन कक्षातील अधिकारी, आशाताई, अंगणवाडी ताई आदींची उपस्थिती होती.
माझ गाव सुंदर गाव उपक्रमांतर्गत परभणी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग नोंदवून रोगराई पासून बचाव करण्यासाठी गावातील नाल्या, काटेरी झुडुपे, आणि सांडपाण्यासाठी शोष खड्ड्यांची निर्मिती करण्याचे आवाहन जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केले आहे.