माधव पिटले / निलंगा : लातूर जिल्ह्यातील रक्तपेढीमध्ये रक्तसाठा उपलब्ध नसल्याचे वृत समजताच सामाजिक बांधिलकी जोपासत पोलिस निरीक्षक अनिल चोरमले यांनी रक्तदान शिबीराचे आयोजन करून २०१ बॅगचे रक्त संकलन केले. यामुळे निलंगा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पोलीस म्हटलं की, नेहमी समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. परंतु सर्वसामान्य माणसांचे जीव वाचवण्यासाठी व त्यांची सेवा करण्यासाठी निलंगा पोलिसांनी कौतुकास्पद पाऊल उचलून एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
या भव्य रक्तदान शिबीराचे सपोनि.डी.एस.ढोणे, पोउनि.एच.एम.पठाण, नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, डॉ.लालासाहेब देशमुख यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून प्रथमता तानाजी नावाडे डॉ.एस.आर.जाधव, ज्ञानेश्वर बरमदे व अयुब सौदागर यांनी रक्तदान करून शिबीराचे उदघाटन केले.
पोलिस अधीक्षक निखील पिंगळे, पो.उपअधीक्षक दिनेशकुमार कोल्हे, यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या रक्तदान शिबीरात पोलिस कर्मचारी एम.एन.महानवर, एम.एम.बेग, एल एम नागटीळक, एम.व्ही शिंदे, ए.एम.सातपोते, प्रणव काळे, एस एस शिंदे, पीआर सुर्यवंशी, एस.बी.सिंदाळकर, व्ही.व्ही अंबर, एच.एस.पडीले, वाय बी मरपल्,ले के.ई.शेख, ए.एम.शेख, के.व्ही,सुर्यवंशी, एस.आर.कोहाळे,यु.बी.कुदाळे, एच.एस.मोमले, डी.एस.थोटे, बी.एन.मस्के, बी.एल.जगताप.आदी सर्व पोलिस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी स्वराज्य सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष दत्ता शाहिर, डॉ लालासाहेब देशमुख, गोविंद इंगळे, यांचे निलंगा पोलिस ठाण्यातर्फे विशेष आभाराचे प्रमाणपञ देऊन सत्कार करण्यात आला. तर भालचंद्र ब्लड बँकेचे रक्त संकलन अधिकारी योगेश गवसाणे, जनसंपर्क अधिकारी दिंगबर पवार व किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर पार पडले.