नाशिकमध्ये उद्यापासुन संचार बंदी

मास्क लावला नाही तर दंड आकारला जाईल

नाशिकमध्ये उद्यापासुन संचार बंदी

नाशिक : राज्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता नाशिकमध्ये संचार बंदी लागु करण्यात आली. उद्यापासुन रात्री ११ रे पहाटे ५ वाजेपर्यत संचारबंदी असणार आहे. अशी घोषणा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. गेल्या काही दिवसापासुन नाशिक मध्ये कोरोना रुग्णांच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे.जर कोरोना आटोक्यात आली नाही तर नाशिक शहरात कडक निर्बंध लागू करणार असल्याच यावेळी सांगितले.तसेच नागरिकांनी यापुढे मास्क लावला नाही तर दंड आकारला जाईल. तसेच त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल असेही यावेळी भुजबळ म्हणाले.

उद्यापासून रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता संचारबंदी लागू करण्यात येत आहे.पुढे बोलताना ते म्हणाले की,लग्नसमारंभात होणारी गर्दी कोरोनाच्या प्रादुर्भावास मुख्य कारण ठरते. मंडप आणि लॉन्सवाल्यांना मी आवाहन करतो की, गोरज मुहूर्तावरील लग्न बंद करा.

नाशिक साधरणपणे ६९ हजार सरकारी कर्मचाऱ्यांना लस देण्याचं ठरवण्यात आलं होतं. ६९ हजार पैकी ४० हजार जणांनी आतापर्यंत लस घेतली आहे. आमच्याकडे लसीचा साठा आहे, आमची सर्व कर्मचाऱ्यांना विनंती आहे की, २८ फेब्रुवारीपर्यंत तुम्ही लस घ्या. असंही छगन भुजबळ यावेळी बोलताना सांगितले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.