पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या वतीने संम्मेलन

देशातील फॅसिझमला नष्ट करण्यासाठी पॉपुलर फ्रंटचे समर्थन करण्याची नितांत गरज..

पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या वतीने संम्मेलन

विजय कुलकर्णी/ परभणी : संविधान वाचविण्यासाठी व देशाची एकता अखंडता कायम ठेवण्यासाठी पॉपुलर फ्रंटचे समर्थन करण्याचे आवाहन रझी खान यांनी पत्रकार परिषदेत केले.पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या वतीने १७ फेब्रुवारी ला संम्मेलन आयोजीत केले आहे.

याबाबत शनिवारी परभणी येथील अतिथी हाॅटेलमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी पुढे बोलतांना खान म्हणाले, देशातील फॅसिझमला नष्ट करण्यासाठी पॉपुलर फ्रंटचे समर्थन करण्याची नितांत गरज आहे. त्यांच्यानंतर जिल्हाध्यक्ष अब्दुस सलाम यांनी मनोगत व्यक्त केले. ग्रँड कॉन्फरेन्स मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याची विनंती केली. हे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही एक उदयोन्मुख सामाजिक संघटना आहे. ज्यांनी शोषित लोकांचे समर्थन करून तसेच सामाजिक मागासलेपणा लक्षात घेऊन मानवतेची मोठी सेवा केली आहे.

पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया दरवर्षी आपला स्थापना दिन उत्साहात साजरा करत आहे, त्याचप्रमाणे यावषीर्ही परभणी शहरात बुधवार १७ रोजी सायंकाळी ७ वाजता गोल्डन फंक्शन हॉलमध्ये एक भव्य परिषद आयोजित करण्यात आली आहे, ज्यातुन देशातली प्रसिद्ध मान्यवर येणार आहेत. यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याची विनंती करण्यात आली आहे. यावेळी खमीसा मो.जुनेद जिल्हा उपाध्यक्ष, अब्दुल सलाम जिल्हाध्यक्ष, आदी उपस्थित होते.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.