नवी दिल्लीः अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी विश्व हिंदू परिषदेकडून देशात वर्गणी गोळा केली जात आहे. राम मंदिर उभारणीच्या मोहीमे मध्ये कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी देखील सहभाग घेतला आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी दिग्विजय सिंह यांनी स्वत: दान दिले असून विश्व हिंदू परिषदेने जमा झालेल्या वर्गणीचा हिशोब जनतेसमोर मांडावा अशी मागणी देखील केली आहे.
आतापर्यंत राम मंदिर उभारणीसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील हातभार लावला आहे. तसेच आता दिग्विजय सिंह यांनी १ लाख ११ हजार १११ रुपयांचा चेक दिला आहे. अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर उभारणीसाठी वर्गणी जमा करण्याचे काम अतिशय सौहार्दपूर्ण वातावरणात व्हावे. तसेच विश्व हिंदू परिषदेने जमा झालेल्या वर्गणीचा हिशोब जनतेसमोर मांडावा अशी मागणी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे.