सिद्धेश्वर गिरी/ सोनपेठ : अयोध्याच्या श्रीराम जन्मस्थान मंदीर निर्माणासाठी सहयोग निधी ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून यात दिंडी,पदयात्रा काढत निधीसाठी जनजागृती करण्यात येत आहे. यात भाजपचे नेते बाळासाहेब जाधव हेही सहभागी होते.
तालुक्यातील सायखेडा,खडका,थडीउक्कडगाव,वाडीपिंपळगाव,कोरटेक,वंदन,शेळगाव,भाऊचा तांडा,डिघोळ,धार डीघोळ,धामोनी या भागात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यात प्रभू श्रीराम म्हणजे हिंदू धर्माचे मूर्तीमंत स्वरुप असून जगाची अस्मिता असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या जन्मभूमीमधील भव्य मंदीर बांधकामास सुरुवात झाली आहे.यासाठी जास्तीत जास्त निधी देऊन आपला सहयोग देण्याचे आवाहन श्रीराम जन्मभूमी मंदीर अयोध्या निधी संकलीत समितीचे तालुका संघटक बालाजी वांकर यांनी केले आहे.
पुढे बोलताना वांकर म्हणाले की, मंदीर म्हणजे अस्मिता आणि ही अस्मिता जपली जावी यासाठी मागील ४९२ वर्षांपासून श्रीराम भक्तांनी अविरत संघर्ष केला आहे.भूतकाळातील या संघर्षात चार लाखाहून अधिक भक्तांनी आपले बलिदान दिले आहे.गेल्या ३६ वर्षात जात,वर्ग,भाषा,लिंग,संप्रदाय अशा सर्व भेदांना बाजूला सारून एकात्मभावाने श्रीराम मंदीर बांधकाम होण्यासाठी संघर्ष चालू होता.कायदेशीर मार्ग निघाला असून लवकरच मंदीर बांधकाम पूर्णत्वास जाईल या भव्य मंदिराच्या निर्माणासाठी प्रत्येकानी योगदान देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी संतोष दलाल,विजयकुमार महाजन,शशीकुमार शेटे,राकेश मेहता,महेश देशमुख,अनंत सोलापूरकर,विजय शर्मा,गोशाळा संस्थानचे संस्थापक काका महाराज कदम, अमोल पांडे,मोहन खोडवे,ज्ञानेश्वर बोबडे,सतीश महाराज,शैलेश कदम,ऋषिकेश कदम,विक्रम नागवडे,मुंजाभाऊ स्वप्ने,हनुमान होरगुळे,प्रकाश स्वप्ने आदींची उपस्थिती होती.यांनी केले आहे.
विटा(बु.)येथेही दिंडी कार्यक्रम
श्रीराम जन्मभूमी मंदीर अयोध्या निधी संकलनासाठी पाथरी तालुक्यातील विटा(बु.)येथेही सहयोग निधीसाठी श्रीरामचंद्राच्या प्रतिमेसह रामायण प्रतीची ग्रंथदिंडी काढण्यात आली होती.यावेळी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख बाळासाहेब आरबाड यांनी मनोगत व्यक्त करत श्रीराम मंदीर बांधकामास सहयोग निधी देण्यासाठी दानशूरांनी पुढे येण्याचे आवाहन केले.यावेळी श्रीराम जन्मस्थान मंदीर बांधकाम निधी संकलीत समितीचे पाथरी तालुका संघटक हनुमान घुंबरे,स्वराज घुंबरे,शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख बाळासाहेब आरबाड,भाजपाचे युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस शरद हारकाळ,भाजपचे रमेश हारकाळ,राम हारकाळ,उत्तम हारकाळ,विश्वनाथ आरबाड,माजी सरपंच उत्तम आरबाड,सुभाष हारकाळ, रामभाऊ हारकाळ,अवधूत गिरी,दत्ताबुवा गिरी,यशवंत हारकाळ,गजानन आरबाड,भानुदास कळसाईतकर,बाबासाहेब आरबाड,बालासाहेब हारकाळ,त्रिंबक आरबाड,भागवत आरबाड,महादू हारकाळ,राजेभाऊ हारकाळ,गणेश काडवदे,भीमराव आरबाड,कुलदीप हारकाळ यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.