कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात

उपजिल्हा रुग्णालय निलंगा दि.२५ जानेवारीपासुन कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीमेला सुरुवात झाली आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात

माधव पिटले / निलंगा : शहरातील उपजिल्हा रुग्णालय निलंगा कालपासुन तालुक्यातील शासकीय व खाजगी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे.

शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात कोविड लसीकरणाला सुरुवात झाली आहे. उपजिल्हा रुग्णालय निलंगा दि.२५ जानेवारीपासुन कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीमेला सुरुवात झाली आहे. तालुक्यातील एकूण चौदाशे शासकीय व खाजगी क्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंद झाली असून उपजिल्हा रुग्णालय येथे ८०० कर्मचाऱ्यांची नोंद झाली आहे . तर ग्रामीण रुग्णालय कासारशिरसी येथे ६०० कर्मचाऱ्यांची नोंद झाली आहे. दररोज १२० कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्याचे नियोजन आरोग्य विभागाकडून करण्यात आले असून यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत असून दुसर्‍या टप्प्यात महसूल ,पोलीस व तत्सम कर्मचारी व अधिकाऱ्यांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानंतर जेष्ट नागरिक व ५० वर्षाखालील सह व्याधी असलेल्या जनतेला लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर श्रीनिवास कदम व उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दिलीप सौंदळे यांनी दिली आहे. ही लस नागरिकांसाठी सुरक्षित असून नोंदणी केलेल्या लोकांनी लसीकरणाचा संदेश आल्यानंतर कोरोणा प्रतिबंधक लस टोचून घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.