प्रवासी,चालकांची कोरोना चाचणी

वाहनसुरक्षा सप्ताहानिमित्त आरटीओ मार्फत प्रवासी चालकांची आरटीपीसीआर चाचणी केली आहे.

प्रवासी,चालकांची कोरोना चाचणी

विजय कुलकर्णी/परभणीः उपप्रादेशीक परिवहन कार्यालयातर्फे वाहन चालकांसह प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी आज दि.२२ रोजी करण्यात आली. आतापर्यंत २५० व्यक्तींच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

वाहनसुरक्षा सप्ताहानिमित्त उपप्रादेशीक परिवहन कार्यालयाकडून विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वाहनचालकांसह प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचणी आज करण्यात आल्या. शहरात दाखल होणार्‍या चारही रस्त्यांवर या टेस्ट करण्यात येत आहेत. जिंतूर रस्त्यावरील विसावा कॉर्नर, वसमत रस्त्यावरील असोला पाटी, गंगाखेड रस्त्यावर एसटी वर्कशॉप तसेच बसस्थानक परिसरातही प्रवाशी व चालकांच्या आरटीपीसीआर चाचण्या सुरू करण्यात आल्या. जिल्हा आरोग्य विभागाच्या सहकार्याने व जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.