मनपाची अतिक्रमण विरोधात थेट कारवाई

रिंग रोडवरील अतिक्रमणे शहर महानगरपालिकेने अखेर मोठ्या पोलिस बंदोबस्तात पाडली...

मनपाची अतिक्रमण विरोधात थेट कारवाई

विजय कुलकर्णी/ परभणी : शहरातील वसमत रोड आणि उघडा महादेव मंदिर परिसर व जायकवाडीच्या डाव्या कालव्यापर्यंत जाणा-या रिंग रोडवरील अतिक्रमणे शहर महानगरपालिकेने अखेर गुरुवार दि.११ रोजी मोठ्या पोलिस बंदोबस्तात पाडली.

दरम्यान,बुधवारीच ही अतिक्रमणे पाडण्यात येणार होती परंतु तेथील काही नागरिकांनी अतिक्रमण काढण्यास आक्षेप घेतल्याने ही मोहीम बारगळली होती.आज सकाळी मनपा उपायुक्त प्रदीप जगताप, महेश गायकवाड, नगर रचनाकार किरण फुटाणे, रईस खान, आर.एन. खान, सहाय्यक आयुक्त श्रीकांत कांबळे, शहर अभियंता वसिम खान पठाण, मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड यांच्यासह सफाई कामगार, स्वच्छता निरीक्षकांचे पथक अतिक्रमण काढण्यासाठी दाखल झाले होते. जेसीबी मशीनच्या सहाय्याने हे अतिक्रमण काढण्यास सकाळी १० ला सुरुवात करण्यात आली.

दरम्यान, वसमत रोड ते उघडा महादेव मंदिर परिसराकडून जायकवाडीच्या डाव्या कालव्यापर्यंत जाणा-या रस्त्यावर म्हणजेच रिंग रोडवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे जल वाहिनी टाकण्यास अडथळे निर्माण होऊ लागले होते. जलवाहिनी अंथरण्याच्या कामासाठी तेथील अतिक्रमण काढणे गरजेचे असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिकेने कर्मचा-यांच्या पथकांसह यंत्रसामुग्रीसह येथे दाखल होत पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात मोहीम सुरू केली. आणि अखेर गुरुवारी ही अतिक्रमणे मनपाने जमीनदोस्त केली आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.