विजय कुलकर्णी/ परभणी : पाथरी येथील श्री संत साईबाबा मंदिर विकास आराखड्याच्या जमीन अधीग्रहण, रस्ते रुंदीकरण व अन्य विकासकामांकरिता भूमीअभिलेख व नगरपालिका प्रशासनाने आज मोजणीच्या कामांना प्रारंभ केला. श्रीसंत साईबाबा विकास आराखडा कार्यक्रमांतर्गत नमुद केल्याप्रमाणे शहरातील सहा रस्ते व साईबाबा मंदीरापासुन ४० मीटर सभोवतीचे क्षेत्र या भागात १२ मिटरचे रस्ते रुंदीकरण आणि साई मंदीर परिसर विकासाकरिता जमीन अधिग्रहीत करण्यासंदर्भात प्रत्यक्ष मोजणीच्या कामांना आज आ.बाबाजानी दुर्राणी यांच्या हस्ते प्रारंभ झाला.
भुमिअभिलेख कार्यालय व नगर परिषदेच्या अधिकारी-कर्मचा-यांच्या संयुक्त पथकाव्दारे सुरू केलेल्या या उपक्रमाच्या वेळी हनुमान मंदीर, शिंदे गल्लीतील रस्ता, साईबाबा मंदीराकडे जाणारा मार्गावर मोजणीच्या शुभारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नगराध्यक्ष मीनाताई नितेश भोरे, उपाध्य हन्नान खान दुर्राणी, बांधकाम सभापती गोविंद हारकळ, स्वच्छंता सभापती कलिम अन्सारी, नगरसेवक अन्सारी युसुफोद्दीन, महिला व बालकल्याण सभापती अलोक चौधरी, नगरसेवक अजय पाथरीकर, नगरसेवक सतिश वाकडे, नगरसेवक किरण भाले पाटील, नगरसेवक राजीव पामे, मुंजाजीराव भाले पाटील, नगरसेवक राजेश पाटील, माजी नगरसेवक अनिल पाटील, साईबाबा मंदीराचे विश्वस्थ यांच्यासह भुमिअभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक किशोर गायकवाड व मोजणी टेक्नीकल कर्मचारी तसेच पाथरी नगर परिषद कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी राघवेंद्र विश्वामित्रे, भाले, विपुल कु-हाडे, महेश कमद, किशारे भिसे, निखिलेश वाडेकर, सिद्दीकी, बळवंत दिवाण, राजेश सिकवाल यांच्यासह आदि उपस्थित होते.