९३ हजार कोंबड्यांवर मृत्यूचे सावट

अचानक नऊ शेळ्या दगावल्याने पशू पालकात भितीचे वातावरण

९३ हजार कोंबड्यांवर मृत्यूचे सावट

विजय देशमुख/ निलंगा : कोरोना संसर्गाची भिती कमी होत नाही तोपर्यत आता लातूर जिल्ह्यात बर्ड फ्लू या रोगाने शिरकाव केला असून जिल्हाभरात कोंबड्या व पक्षी मरण्याचे सत्र सुरूच आहे. तालूक्यातील रामलींग मुदगड येथे अचानक नऊ शेळ्या मृत्यूमुखी पडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे तालुक्यातील ९३ हजार ४७२ कोंबड्यावर मृत्यू चे सावट असून बर्ड फ्लू आता शेळ्या मध्ये तर आला नाही ना? अशी भिती व्यक्त होत आहे. जर बर्ड फ्लू ने तालुक्यात शिरकाव केला तर या कोंबड्याच्या जीवावर टांगती तलवार असणार आहे. अद्याप बर्ड फ्लू ने शिरकाव जरी केला नसला तरी ९३ हजारापेक्षा जास्त कोंबड्याच्या जिवावर सध्या टांगती तलवार असून जर कोंबड्याची मरतूक सुरू झाली तर या कोंबड्या मारण्याशिवाय काही पर्याय राहणार नाही.त्यामुळे अगोदर कोरोना ने व आता बर्ड फ्लू मुळे ग्रामीण भागात धास्ती पसरली आहे.

सध्या ग्रामीण भागामध्ये कोरोना ची धास्ती आहे. त्यातच बर्ड फ्लू चा शिरकाव झाल्याने अनेक पशूपालक चिंतेत आहेत.ग्रामीण भागामध्ये शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी शेळी पालन तसेच कोंबडी पालनाचा व्यवसाय करत आहेत.अगोदरच कोरोना संसर्गामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या अर्थिक संकटाचा सामना करतोय.त्यातच बर्ड फ्लू ने कोंबड्या दगावत असल्यामुळे व अचानक नऊ शेळ्या दगावल्याने पशू पालकात भितीचे वातावरण पसरले आहे .निलंग्यात पोल्ट्री व घरगूती मिळून ९३ हजारांपेक्षा जास्त कोंबड्याची नोंद आहे.जर यांना बर्ड फ्लू ची लागण झाली तर यांना मारण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. त्यामुळे पशू पालकामध्ये भितीचे वातावरण दिसत आहे .


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.