माधव पिटले / निलंगा : राजकारणातील प्रत्येक निवडणूक प्रचाराची सुरुवात असो, अथवा कोणतेही शुभ कार्य करताना जाज्वल्य देवस्थान हनुमानाचे दर्शन घेवूनच व त्यांच्या प्रेरणेनेच गावात माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली भरीव निधी देऊन विकास करता आला. यापुढेही गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन युवा नेते.अरविंद पाटील निलंगेकर यांनी केले. तालुक्यातील माकणी थोर येथे त्यांच्या हस्ते सुमारे २२ लक्ष रुपयाच्या भव्य ग्रामपंचायत इमारतीचे लोकार्पण पार पडले यावेळी ते बोलत होते.
यावेळीं कार्यक्रमाच्या अध्यक्ष उपसरपंच मधुकर माकणीकर तर पं.स.सभापती राधाताई बिराजदार, नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, जि.प सदस्य संतोष वाघमारे, माजी सभापती अजित माने, चेरअमन दगडू सोळुंके, सहा.पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी ,श्रीनिवास श्रीमंगले ग्रामसेवक डी.आर. भोसले, आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना निलंगेकर म्हणाले की, भारतीय जनता पार्टी सत्तेवर असताना सर्वाना समान न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला असून, अनेक गावात महत्वकांक्षी योजना राबविण्यात आल्या आहे. तसेच जि.प .च्या माध्यमातून शाळा,आरोग्य व गावातील रस्ते यासाठी निधी मोठ्या प्रमाणात दिला आहे. यापुढे ही देण्यात येणार आहे निधी व विकास कामे कमी पडू देणार नाही.असे अश्वासन यावेळी निलंगेकर यानी दिले, ग्रामपंचयतीसाठी नागरिकांनी सहकार्य करावे तरच गावचा विकास होतो असे आवाहन निलंगेकर यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन एम.एम.जाधव यांनी तर प्रास्ताविक तानाजी सुर्यवंशी यांनी केले आभार मधुकर माकणीकर यांनी मांडले.यावेळी ग्रा.प सदस्य बालाजी सूर्यवंशी,व्यंकट गायकवाड,कृष्णा आकडे,चेरमन लक्ष्मण आकडे,भाऊराव येळीकर,मारुती गायकवाड,दिगंबर पाटील,वामन येळीकर,परमेश्वर सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.