रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची मागणी; टाटांनी दिले हे उत्तर

रतन टाटा यांना भारतरत्न देण्यात यावा. यासाठी सोशल मीडियावर मोहीम

रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची मागणी; टाटांनी दिले हे उत्तर

भारतीय उद्योगपती, दानशूर व्यक्ती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना भारतरत्न देण्यात यावा. यासाठी सोशल मीडियावर एक मोहीम सुरू करण्यात आली आहे. याबाबत टाटा यांनी आता ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "मी लोकांच्या भावनांचे कौतुक करतो, पण अशा सोशल मिडियावरील मोहिमा थांबवल्या पाहिजेत' असं टाटा यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे. ट्विटरवर एक गट टाटा यांना भारतरत्न देण्याची जोरदार मागणी करीत आहे. सोशल मीडियावर यासाठी एक मोहीम देखील राबविली जात आहे.

हे अभियान थांबविण्याचे आवाहन करताना टाटा यांनी ट्विट केले की, “सोशल मीडियावर लोकांच्या एका वर्गाने एखाद्या पुरस्काराबद्दल व्यक्त केलेल्या भावनांचे मी कौतुक करतो, पण अशा मोहिमा बंद व्हाव्यात असे मी नम्रपणे आवाहन करतो. मी स्वत: ला भाग्यवान समजतो. भारतीय प्रगती आणि समृद्धीसाठी योगदान देण्यास मी सक्षम आहे.

रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची मागणी ट्विटरवरुन मोटिवेशन स्पीकर डॉ. विवेक बिंद्रा यांनी सुरू केली होती. आमच्या मोहिमेत सामील व्हा आणि शक्य तितके हे ट्विट रीट्वीट करा. यानंतर रतन टाटा आणि BharatRatnaForRatanTata हे हॅशटॅग टॉप ट्रेंडमध्ये आले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.