परभणी : गेली तीन-चार दिवस शहर मनपाने अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. यामुळे प्रशासकीय इमारत परिसरातील छोटे विक्रेते रस्त्यावर आले आहेत. त्यांनी व्यवसायासाठी जागा ऊपलब्ध करुन द्यावी अशी मागणी आज जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
यासंदर्भात व्यावसायिकांनी निवेदन दिले आहे. ज्यामध्ये रोजगारासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. प्रशासकीय इमारत परिसरात चहा, पानसुपारी किंवा अन्य छोटछोटे व्यवसाय करीत आम्ही आतापर्यंत उदरनिर्वाह करीत आलो. परंतू सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाई करत तेथून हटविले. त्यामुळेच व्यावसायिक बेरोजगार झालो आहोत. कुटुंबियाचा उदरनिर्वाह चालवावा कसा असा प्रश्न उभा राहिला आहे, असे नमुद करीत लक्ष्मण सटवाजी कांबळे या चहा विक्रेत्याचे याच चिंतेेने मंगळवारी हदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे नमुद करीत या विक्रेत्यांनी प्रशासनाने कांबळे यांच्या कुटुंबियास मदत करावी व प्रशासकीय इमारत परिसरात गाडे लावण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. त्यावर शोभाबाई कांबळे, सत्यनारायण शर्मा, दिलीप वानखेडे, अब्दुल रहेमान, उस्मान खान, भारत चेऊलवार, कपील गायकवाड, बालाजी दमकोंडे, नारायण धोंडगे, शुभम सुरजोसे, शेख नईम शेख चाँद आदीच्या स्वाक्ष-यां आहेत.