नंदुरबार : विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागावर कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. विधान सभेचे अध्यक्ष पद हे काॅग्रेस कडे असल्याने या जागेवर अनेक नेत्याची नाव चर्चात आहेत. यात आदिवासी विकास मंत्री के. सी पाडवी यांच्या नावाची चर्चा जोरदार सुरु आहे. याबाबत के.सी. पाडवी यांना विचारल असतं ते म्हणाले राजकारणात अशा चर्चा होत. असं वक्तव्य केलं आहे.
विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या चर्चेअगोदर माझ्या नावाची चर्चा प्रदेशाध्यक्षपदासाठी होत होती. राजकारणात चर्चा कायम होत असतात. मात्र अशा परिस्थितीत आपण न थांबता पक्षासाठी काम करत राहणं महत्त्वाचं असतं. मी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असून पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते नंदूरबार मध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.