मतदानावेळी दोन गटात वाद ; सुरक्षा बलाच्या तुकड्या तैनात

वादाच रूपांतर दगडफेकीत

मतदानावेळी दोन गटात वाद ; सुरक्षा बलाच्या तुकड्या तैनात

सिद्धेश्वर गिरी/ सोनपेठ :सरपंच पदासाठी आज राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुका पार पडत असताना परभणी जिल्ह्यातल्या एका मतदान केंद्रावर निवडणूक चिन्ह का सांगितले म्हणून दोन गटात वाद झाल्याची घटना घडली आहे.वादाच रूपांतर दगडफेक करण्यापर्यत पोहचलं.

विटा(बु)ता.पाथरी येथे मतदान प्रक्रिया पार पडत असताना.मतदान केंद्रावर एका गटाच्या समर्थक कार्यकर्त्यांने चिन्ह सांगितले असता. याचा राग मनात धरून दुसऱ्या गटाच्या कार्यकर्त्यांने जाब विचारण्याचा प्रयत्न करताच तेथे वाद निर्माण झाला. छोट्या वादाचे परावर्तन मोठ्या वादात झालं एकाच्या घरावर दगडफेक करण्यात आली.या घटने नंतर लगेच राज्य राखीव सुरक्षा दलातील जवानांना पाचारण करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.