माधव पिटले/ निलंगा : तालुक्यातील तांबाळा प.स.गणातील ८ गावांमध्ये दिव्यांग लाभार्थी व्यक्तीना साहित्य वाटप करण्यात येणार असून त्यातील प.स. गणातील कलमुगळी येथे साहित्य वाटप करण्यात आले आहे. तांबाळा प.स.गणातील कलमुगळी येथील चोदा दिव्यांग व्यक्तीना चार्जींग सायकल, कृञीम पाय, श्रवण यंञ, व्हील चेअर, काठ्या दोन, तीन सायकल, हेल्मेट असे साहित्य कलमुगळी येथील दिव्यांग व्यक्तींना सभापती राधा बिरादार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी सुरेश बिराजदार, सरपंच राजेंद्र सुर्यवंशी, उपसरपंच सतीश मुळे, ग्रा.प.सदस्य रविंद्र तांबाळे, ग्रामसेवक बी.आर.राऊत, अब्बास निटूरे, कल्लापा गुड्डा, दत्ता शिंदे, बब्रूवान शिंदे आदि उपस्थित होते. तांबाळा गणातील आठ गावातील ममदापूर माळेगाव कल्याणी ताडमुगळी वाकसा टाकळी तांबाळवाडी आदि गावातील दिव्यांग व्यक्तींना साहित्य वाटप लवकरच करण्यात येणार आहे, अशी माहिती प,स.सभापती राधाताई बिराजदार यानी दिली.