पाटबंधारे विभागाच्या नाकर्तेपणामुळे ऊसतोड कामगारांची संक्रात चिखलात

पाटबंधारे विभागाला जाग येईल का?-डी.आर.मोकाशे

पाटबंधारे विभागाच्या नाकर्तेपणामुळे ऊसतोड कामगारांची संक्रात चिखलात

सिध्देश्वर गिरी/सोनपेठ: पाटबंधारे विभागाच्या नाकर्तेपणामुळे सद्या सुरू असलेल्या ऊस तोडणी हंगामातील ऊसतोड कामगारांना चिखलात संक्रात साजरी करावी लागली आहे. कारखाना प्रशासनाने दोन वेळा तक्रार करूनही पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांना जाग येत नसल्याने ऊसतोड कामगारांमधून संताप व्यक्त केला जात आहे. मागील अनेक दिवसांपासून पाथरी तालुक्यातील ग्रामीण भागातील विकासाला अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे ग्रहण लागले आहे. याला राजकीय पुढारीही तेवढेच जबाबदार असून "भर अब्दुला गुड थैली में" या म्हणीचा प्रत्यय पाथरी तालुक्यातील शेवटच्या टोकाला असणाऱ्या गावाच्या बाबतीत येऊ लागला आहे.

यात लागलेले विकासरूपी ग्रहण सुटत नाही. पैठण उजवा कालवा येथून आलेल्या चारीचा डावा कालवा लिंबा येथून जातो. मात्र मागील २० वर्षांपासून लिंबा येथील या डाव्या कालव्याला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे फुलारवाडी येथून पुढे पाणीच येत नसल्याने. सदर तक्रार शासनपातळीवर करण्यात आल्यानंतर बोगस पाणीवापर संस्थेवर कार्यवाही होऊन डावा कालवा कार्यान्वीत करण्यात आला खरा! मात्र थातूरमातूर कामामुळे असंख्य शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले. यासोबतच योगेश्वरी शुगर इडस्ट्रीज लिंबा येथून जाणाऱ्या याच डाव्या कालव्याच्या एका भागात भगदाड पडल्याने ऊसतोडणी करण्यासाठी आलेल्या मजुरांच्या खोप्यामध्ये पाणी जावून त्यांना संक्रांतीसारखा महत्वाचा सण पाण्यात आणि चिखलात साजरा करावा लागला आहे.

पाटबंधारे विभागाला जाग येईल का?-डी.आर.मोकाशे
पाटबंधारे विभागाला वारंवार पत्रव्यवहार करूनही विभागाला जाग येत नसल्याने. आज ३०० कुटुंबाना संक्रातीसारखा महत्वाचा सण पाण्यात चिखलात साजरा करावा लागला आहे. यासारखे दुर्देव या विभागाचे असूच शकत नाही.पाथरीतील कर्मचारी हे बेजबाबदारपणाचे असून अशा कर्मचाऱ्यांना त्यांच्या करत असलेल्या कामाची इच्छाशक्ती दिसत नाही. त्यामुळे अशा कामचुकार वरिष्ठांनी कर्मचाऱ्यांवर वरिष्ठांनी कार्यवाही करावी. या मागणीसोबतच पाथरी विभागातील झोपेचे सोंग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना कधी जागे करा. अशी मागणीही योगेश्वरी शुगर इंडस्ट्रीजचे शेतकी अधिकारी डी.आर.मोकाशे यांनी केली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.