सिद्धेश्वर गिरी / सोनपेठ : तालुक्यातील लासीना ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सौ.सौमित्रा शामसुंदर परांडे तर उपसरपंचपदी परमेश्वर परांडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीसाठी प्रशासनाने नुकतीच लासीना ग्रामपंचायत कार्यालयात एक बैठक आयोजित केली होती. यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर.आर.पाचलेगावकर यांनी काम पाहीले तर त्यांना तलाठी आर.आर.चिकटे, ग्रामसेवक पी.आर.पितळे यांनी सहाय्य केले. लासीना ग्रामपंचायतीवर मागील १० वर्षांपासून शामसुंदर परांडे यांचे वर्चस्व असून त्यांनी लासीनच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून कामे केली आहेत. तसेच गावातील सामान्य व्यक्तींसाठी उपलब्ध असणारे सरपंच अशी त्यांची ख्याती असल्यानेच यावेळी गावातील सर्व विरोधक एकत्र येऊनही शामसुंदर परांडे यांच्या नेतृत्वाखालील पँनलला ग्रामस्थांनी भरभरून पाठींबा देत त्यांच्या पँनलच्या नऊपैकी सात उमेदवारांना भरभरून मते देऊन निवडून दिले आहे. अवघ्या काही मतांच्या फरकाने दोन जागांवर त्यांच्या उमेदवारांना पराभव पत्करावा लागला होता. दरम्यान या निवडीसाठी आयोजित केलेल्या बैठकीत सरपंचपदासाठी सौ.सौमित्रा शामसुंदर परांडे तर उपसरपंचपदासाठी परमेश्वर परांडे यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले.
गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत ग्रामस्थांनी मोठ्या विश्वासाने आमच्या पँनलच्या उमेदवारांना पुन्हा संधी दिली. या संधीचे सोने करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून गावाचा सर्वांगीण विकास हेच ध्येय होते.आणि राहील विकासकामे करताना प्रत्येकाला विश्वासात घेऊनच ते मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध असल्याचे माजी सरपंच तथा काँग्रेसचे नेते शामसुंदर परांडे यांनी मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी ग्रामस्थांचे आभारही मानले