अभियांत्रिकी माजी विद्यार्थी संघटना नविन कार्यकारिणी घोषित

उद्योजक मा. श्री. नितीन सोमाणी यांची अध्यक्षपदी तर सामाजिक कार्यकर्ते लेखक प्रकाशक श्रीकांत उमरीकर यांची सचिवपदी निवड करण्यात आली.

अभियांत्रिकी माजी विद्यार्थी संघटना नविन कार्यकारिणी घोषित

औरंगाबादः शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद च्या माजी विद्यार्थी संघटनेची वार्षिक निवडणुक शनिवार २० फेब्रुवारी २०२१ रोजी सर्वसंमतीने बिनविरोध पार पडली. उद्योजक मा. श्री. नितीन यांची अध्यक्षपदी तर सामाजिक कार्यकर्ते लेखक प्रकाशक श्रीकांत उमरीकर यांची सचिवपदी निवड करण्यात आली. नविन कार्यकारिणीत सुधीर बोंडेकर (उपाध्यक्ष), सुधीर शिरडकर (कोषाध्यक्ष), गिरीश लोया (सहसचिव), डॉ. उत्तम काळवणे (सह कोषाध्यक्ष), मेजर सईदा फिरासत (महिला प्रतिनिधी), मकरंद राजेंद्र (जनसंपर्क अधिकारी) म्हणून काम पाहणार आहेत.

गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटपाचा कार्यक्रम गेली ७ वर्षे यशस्वीरित्या चालू आहे. तो पुढेही चालू राहिल तसेच संघटनेची इमारत, विविध उपक्रमांना चालना, उद्योग जगताशी सुसंवाद निर्माण होईल असा निर्धार नुतन अध्यक्ष नितीन सोमाणी यांनी व्यक्त केला. माजी अध्यक्ष मा. शिवप्रसाद जाजू, शिरीष तांबे, त्रिलोकसिंग जबिंदा यांनीही सभेस मार्गदर्शन केले.

नविन कार्यकारिणीत प्राचार्य प्राणेश मुरनाळ, अजीत सौंदलगीकर (माजी अध्यक्ष), डॉ. नितीन भस्मे, सुरेश तांदळे, रंगनाथ चव्हाण, आशिष अग्रवाल, रविंद्र गायकवाड, डॉ. संजय शिंदे (प्राध्यापक प्रतिनिधी), प्रा. विवेक क्षीरसागर (प्रध्यापक प्रतिनिधी), सुरेंद्र पाटील, सुमेधा कुरूंदकर बोर्डे, किरण यंबल, चंद्रशेखर पालवणकर, प्रशांत नानकर, अद्वैत कुलकर्णी, अमृत संघई (मुंबई प्रतिनिधी), संदीपान रेड्डी (मुंबई प्रतिनिधी), दीपक माहुरकर (पुणे प्रतिनिधी), अजय शिंदे (पुणे प्रतिनिधी) यांचा समावेश करण्यात आला आहे. या निवडणुकीसाठी निवडणुक अधिकारी म्हणून प्रा. संतोष आटीपामलू व प्रा.डि.ए.देसाई यांनी काम पाहिले. माजी विद्यार्थी संघटना जास्तीत जास्त लोकाभिमुख करण्यात येणार असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी मकरंद यांनी पत्रकारांना दिली.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.